या पुरुषप्रधान समाजात स्त्रीला एक उपभोगाची वस्तू म्हणून गेली हजारो वर्षे पाहिलं जात आहे. स्वतःला सभ्य म्हणवणाऱ्या समाजात स्त्री चार भिंती च्या आत असो की बाहेर, तिच्याकडे हा समाज फक्त आणि फक्त उपभोगाच्या नजरेने पाहतो. काळ बदलला, माणूस प्रगत झाला सगळ खर आहे पण मानसिकता आज हि तीच आहे. अश्याचं एका सामाजिक मानसिकतेला “वली बाळांतीन” या आपल्या नाटकातून नवोदित लेखिका दिग्दर्शका क्षितीजारणी शिवकन्या पहिलवान ने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
हे नाटक कोल्हाटी समाजातील चालत आलेल्या परंपरेवर आधारित आहे .त्या मुलीला वयात आल्यावर तिची बोली लाऊन एका धनाढ्य पाटलाला विकल जात. तिला दिवस गेल्या नंतर तो पाटील तिला सोडून देतो . तिचा बाप तिला फडात नाचायला जा म्हणून त्रास देतो. ती तिच्या मुला साठी लोकांच्या वासनिक नजरा सहन करून येणाऱ्या प्रसंगाला कशी सामोरे जाते हे सार भावनिक पद्धतीने यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे .
या नाटकाच्या नेपथ्य ची जबाबदारी दत्तात्रय थिटे याने उत्तम पद्धतीने पार पाडली आहे. तसेच या नाटकासाठी स्वाती थिटे व अजय कांबळे यांनी गाणी लिहिली आहेत.
या नाटकातील जवळपास सर्वच नवोदित कलाकार आहेत ज्यांनी उत्तम पद्धतीने अभिनय केला आहे. या नाटकच्या निर्मितीची जबाबदारी “स्वल्पविराम” या निर्मिती संस्थेने घेतली आहे.
अहमदनगर मध्ये नुकत्याच पार पडलेल्या “दाजीकाका गाडगीळ करंडक” च्या प्रथम फेरीत या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. तसेच पुढे अनेक स्पर्धा मध्ये हे नाटक सादर करण्यात येणार आहे .
बातमी: अजय कांबळे
(मिलेनिअल मराठी)
या पु

